जळगावात घरफोडी; ११ हजारांची रोकड लंपास

sambhaji nagar chori

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहुनगरात बंद घरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून घरातील ११ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शकील नामदार तडवी (वय-३०) यांच्या घरात ही चोरी झाली आहे. तडवी कुटंबिय २८ ऑक्टोबरपासून भडगाव येथे गेले होते. सोमवारी सायंकाळी शकील तडवी हे घरी आले. परंतू, त्यांच्या पत्नी व मुले बाहेरगावी असल्यामुळे ते परिसरात राहणाऱ्या मोठ्या भावाकडे जाऊन जेवण करुन तेथेच झोपले होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एका कोठीतील ११ हजार रुपयांची रोकड, गॅस सिलेंडर व एक कपडे ठेवलेली बॅग चोरट्यांनी लांबवली. मंगळवारी सकाळी ८ वाजता शकील तडवी घरी आले तेंव्हा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन तपासले असता सर्व सामान अस्ताव्यस्त केलेला होता. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तडवी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content