Home क्राईम जळगावात बंद घर फोडले; दागीन्यांसह रोकड लंपास

जळगावात बंद घर फोडले; दागीन्यांसह रोकड लंपास

0
41

chori1

जळगाव प्रतिनिधी । बंद घर असल्याचा फायदा घेत ऑडीटर कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने, चांदीसह एकुण 1 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राकेश आनंद साळी (वय-32) रा. ऑडीटर कॉलनी, गुजराल पेट्रोलपंपाजवळ हे आपल्या कुटुंबियांसोबत नातेवाईकांकडे कामासाठी रविवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळी गेले. बंद घर असल्याचा फायदा घेतल अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री घराला पुढील दरवाजाचे लोखंडी ग्रील तोडून लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडला. घरातील कपाटात ठेवलेले सोने, चांदीचे दागीने आणि काही रोकड रक्कम अशी एकूण 1 लाख रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. साळी यांच्या घराच्या बाजूला राहत असलेले सुर्यवंशी यांना हा प्रकार सोमवारी 16 रोजी सकाळी लक्षात आल्याने त्यांनी राकेश साळी यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली. याप्रकरणी राकेश साळी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहे.


Protected Content

Play sound