जळगावात अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एम.जे.कॉलेज परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामनगर भागात अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. २ जुलै रोजी मुलगी एम.जे. कॉलेज परिसरात आली असता, तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने मुलीच्या आईने तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.

Protected Content