गर्दीचा फायदा घेत तरूणाचे दोन मोबाईल लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनीत चटोरी गल्लीत फिरत असलेल्या तरुणाचे गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १६ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ येथे शेख ईब्राहीम शेख खलील (वय-२४) हा तरुण वास्तव्यास आहेत. शेख इब्राहीम हा २९ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मास्टर कॉलनी परिसरातील चटोरी गल्लीत फिरत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १० हजार रुपये किंमतीचा पहिला तर ६ हजार रुपये किंमतीचा दुसरा असे एकूण दोन १६ हजार रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी लांबविले. परिसरात शोध घेवूनही मोबाईल सापडले नाही. त्यानंतर शेख इब्राहीम याने रविवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सय्यद हे करीत आहेत.

Protected Content