आसोद्यात तरूणाला तीक्ष्ण हत्याराने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन एका तरुणाला तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने जखमी केल्याची घटना तालुक्यातील आसोदा गावात घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आसोदा गावातील कोळीवाडा येथे तोशल अर्जुन कोळी वय १८ हा राहतो. तोशल हा रविवारी दुपारी गावातील बहिणाबाई उद्यान येथे फिरत असतांना त्याने समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक जण यांच्याकडे बघितले. आमच्याकडे पाहिले, या कारणावरुन समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक जण अशा तिघांनी शिवीगाळ करत तोशल यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यात अभिषेक याने तोशील याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. तर एकाने तोशील यास पकडून ठेवत समाधान हाडे याने तोशील यास लाकडी काठीने डोक्यावर तसेच उजव्या हातावर मारहाण केली. यात घटनेत तोशील हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन समाधान हाडे, अभिषेक भालेराव व आणखी एक अनोळखी तरुण अशा तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे हे करीत आहेत.

Protected Content