जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने शेवगाव (अहमदनगर) येथे १३ ते १६ मार्च दरम्यान ६० व्या हिरक महोत्सवी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार आहे.
जळगाव जिल्हा संघाची निवड जिल्हा सचिव राहुल पोळ, दिलीप चौधरी, विशाल पाटील यांनी केली आहे. या संघाला संस्थेचे पदाधिकारी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छाव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, सौ. विद्या कलंत्री, उदय पाटील, सुनील समदाणे, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, राज्य सहसचिव जयांशू पोळ, डॉ. सुरेश थरकुडे, नामदेव सोनवणे, अनंता समदाणे, चंद्रकांत महाजन, दत्ता महाजन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पुरुष संघाचे नेतृत्व मोहित गुंजकर करत आहे, तर महिला संघाचे नेतृत्व अंजली सावंत करत आहे. दोन्ही संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे.

पुरुष संघ: मोहित गुंजकर (कर्णधार), चैतन्य पोळ, प्रथमेश कंखरे, हिमांशू पाटील, प्रतीक सपकाळे, अनिल बारेला, प्रणव जोगी, अमित तडवी, तेजस चौधरी, कण्वीमोदीन तडवी, रोहित कोळी, समीर तडवी, रोहित नवले, केतन चौधरी.
महिला संघ: अंजली सावंत (कर्णधार), हेतल पाटील, नंदिनी पाटील, विभा सोनवणे, लक्ष्मी पावरा, पूर्वा पाटील, पायल पावरा, सोनाली थेंगट, अंतरा सराफ, पूर्वी सोनवणे, प्रतीक्षा सपकाळे, उन्नती सोनवणे, यज्ञा पवार, भाग्यश्री कोळी, लावण्या बडगुजर.
पुरुष संघाचे प्रशिक्षक दिलीप चौधरी आहेत, तर महिला संघाचे प्रशिक्षक विशाल पाटील आहेत. दोन्ही संघांनी स्पर्धेसाठी कसून सराव केला आहे.


