चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव येथील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणावर संपन्न झालेल्या खासदार चषक २०२३ स्पर्धेत जळगावच्या गोल्डन इलेव्हनने विजेतेपद पटकावले.
आज चाळीसगाव येथील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणावर संपन्न झालेल्या खासदार चषक २०२३ या स्पर्धेचा बक्षीस वितरण सौ . संपदा उन्मेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे तर भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख नगरसेवक घृष्णेश्वर पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, उपसभापती सुनीलभाऊ पाटील,सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.सि टी पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक बिरारी, वास्तु विशारदतज्ञ निलेश कांकरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पाच दिवसांपासून खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रायोजकत्वातून ही स्पर्धा भरविण्यात आली. या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून ३२ संघांनी सहभाग नोंदवला. यात चाळीसगाव,चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर ,भुसावळ ,वरणगाव ,फैजपूर, पारोळा, भडगाव येथील संघ सहभागी झाले होते. आज स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आला. चुरशीच्या सामन्यात खासदार प्रायोजित ७१ हजार रुपये प्रथम बक्षीस व आकर्षक चषक जळगाव येथील गोल्डन इलेव्हन संघाने पटकावले संपदाताई पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाचे संघ संचालक फिरोज पठाण यांना पारितोषिक देण्यात आले. खासदार प्रायोजित द्वितीय बक्षिस ४१ हजार रूपये आझाद इलेव्हन संघाचे कर्णधार बबलू अजबे यांनी तर निलेश कांकरिया प्रायोजित तृतीय बक्षीस व चषक सी. टी. केयर संघाचे कर्णधार शैलेश दिघोळे यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन स्वार, अरविंद गोत्रे, प्रशांत ठाकूर यांनी परिश्रम घेतले.विक्की खैरनार,निलेश अजबे, विनोद खैरनार, एकनाथ ठाकूर, प्रशिक चव्हाण, सुरज पाटील, संदीप राठोड, पंकज देशमुख, बबलू चव्हाण, अभिषेक देशमुख यांनी पाच दिवस स्पर्धेसाठी परीश्रम घेतले. स्पर्धेसाठी पंच प्रशांत ठाकूर, धनंजय चव्हाण सर, योगेश बेलदार तर गुणलेखक शैलेश पवार, प्रतिक गवळी, उमेश सोनवणे यांनी तर स्पर्धेचे अतिशय खुमासदार समालोचन फिरोज पठाण, सचिन स्वार, विनोद खैरनार,प्राचार्य मंदार नेरकर यांनी केले.
याप्रसंगी सौ . संपदा उन्मेश पाटील, दिनेश बोरसे, बाबासाहेब चंद्रात्रे, दिपक बिरारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार सचिन स्वार यांनी मानले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शहरातील युवा मोर्चा, भाजपा कार्यकर्ते, खासदार उन्मेशदादा पाटील मित्र मंडळ,नेताजी पालकर चौक क्रीडाप्रेमी मित्रपरिवार यांनी मेहनत घेतली. सर्व स्पर्धेचे युट्युब लाईव्ह प्रक्षेपण शुभम पाटील, गोपाल चव्हाण, कल्पेश पाटील यांनी केले.