जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | जिल्हा प्रशासनाने आगामी जिल्हा परिषद गटांची रचना जाहीर केली आहे. जाणून घ्या जिल्ह्यातील जि.प. चे वाढीव गट आणि यात सहभागी गावांची नेमकी संख्या किती असेल ते ?
जळगांव जिल्हयातील जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणार्या पंचायत समिती निवडणुक २०२२ अंतर्गत ७७ गट व १५४ गण यांची प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसुचना जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय , सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालय व तसेच सर्व गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रभाग रचने संदर्भात ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे दिनांक ०८/०६/२०२२ किंवा तत्पुर्वी लेखी सादर कराव्यात उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात घेणार नाही. सदर हरकती वरील सुनावणी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे दिनांक १०/०६/२०२२ रोजी घेण्यात येणार आहे.
जळगाव जिल्हा परिषदेत आधी ६७ गट आता वाढीव होऊन ७७ झाले आहेत. अर्थात, १० जि.प. गट वाढले असतांना पंचायत समिती गणांची संख्या देखील २० ने वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील नव्याने संरचना करण्यात आलेले जिल्हा परिषद गट आणि यातील गावाची यादी खालीलप्रमाणे आहे.
गट क्रमांक गटाचे नाव | ग्रामपंचायतींची संख्या | एकूण समाविष्ट गावे
चोपडा तालुका
१ विरवाडे १३ २४
२ अडावद ८ १६
३ अकुलखेडा १७ २२
४ लासुर १५ १९
५ चहार्डी १६ १८
६ वर्डी २१ २५
यावल तालुका
७ किनगांव बु ९ १३
८ दहिगांव १२ १९
९ न्हावी प्र यावल ७ ८
१० बामणोद १० १२
११ साकळी १४ १६
१२ भालोद १५ २०
रावेर तालुका
१३ पाल १३ २०
१४ केर्हाळे बु. १२ १७
१५ वाघोड १८ २१
१६ निंभोरा बु. १२ १३
१७ चिनावल ९ ९
१८ वाघोदा बु. १३ १५
१९ तांदलवाडी १८ २२
मुक्ताईनगर तालुका
२० अंतुर्ली १४ २१
२१ उचंदे १७ १९
२२ कुर्हा १५ २०
२३ हरताळे १५ २०
एकुण ६१ ८०
२४ नाडगांव २१ २५
२५ शेलवड १७ २५
भुसावळ तालुका
२६ कंडारी ४ ५
२७ निंभोरा बु ९ १३
२८ तळवेल १५ १७
२९ कु-हे प्र.न. ११ १६
जळगाव तालुका
३० कानळदा २२ २६
३१ असोदा ११ १२
३२ कुसुंबे खुर्द ११ १५
३३ शिरसोली प्र.न. ९ ११
३४ म्हसावद १६ २२
धरणगाव तालुका
३५ नांदेड २४ २६
३६ पाळधी खु १३ १४
३७ पिंप्री खु २१ २४
३८ साळवा १६ २५
अमळनेर तालुका
३९ कळमसरे २६ ३२
४० पातोंडा २० २८
४१ दहिवद २६ ३७
४२ मांडळ २५ ३०
४३ जानवे २२ २७
पारोळा तालुका
४४ शिरसोदे १९ २८
४५ म्हसवे २२ ३४
४६ शिरसमणी २२ २९
४७ तामसवाडी २० २२
एरंडोल तालुका
४८ विखरण १६ २०
४९ रिंगणगांव १७ १८
५० कासोदा ७ ११
५१ तळई १२ १६
जामनेर तालुका
५२ नेरी दिगर १२ १३
५३ खडकी १८ २९
५४ सामरोद १४ १८
५५ पाळधी १५ १८
५६ पहूर कसबे ११ १७
५७ पहूर पेठ ११ २०
५८ तोंडापूर १२ २१
५९ फत्तेपूर १३ २१
पाचोरा तालुका
६० बांबरूड प्र.बो. १८ २१
६१ लोहारा १३ १८
६२ पिंपळगांव बु. १५ १६
६३ शिंदाड १६ २३
६४ लोहटार २१ २५
६५ नगरदेवळा १७ २४
लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट
भडगाव तालुका
६६ गिरड १७ २२
६७ गुढे १४ १५
६८ कजगांव १८ २२
चाळीसगाव तालुका
६९ बहाळ १० १३
७० वाघळी १७ २३
७१ टाकळी प्र.चा ९ ११
७२ उंबरखेड १२ १४
७३ मेहुणबारे १३ १७
७४ सायगाव १४ १५
७५ हिरापूर ११ १६
७६ रांजणगाव १३ १८
७७ घोडेगाव ११ १९
लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट
महत्वाची बातमी : असे असतील जिल्ह्यातील पंचायत समितींचे नवीन गण !