सामुदायीक शौचालय अभियानात जिल्ह्यास देशातून तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने सामुदायिक शौचालय अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या खात्याशी संबंधीत पुरस्कारामुळे जिल्हाचा देशात नावलौकीक वाढला आहे.

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने सामुदायिक शैचालय अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला देशपातळीवरील तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.

स्वच्छ भारत दिवस अर्थात दिनांक २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ सुंदर शौचालय अभियान आणि सामुदायिक शैचालय अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, जिल्हा आणि राज्य यांना व्हर्चुअल कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. असे राज्य समन्वयक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना पत्रान्वये कळविले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे राज्याचे पाणपुरवठा व स्वच्छता खाते असून यातील स्वच्छता खात्याशी संबंधीत पुरस्कार हा जळगाव जिल्ह्यास मिळाल्याची बाब ही विशेष मानली जात आहे.

जळगाव जिल्हा परिषदेने सामुदायिक शौचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याला प्रथमच देशपातळीवरील पुरस्कार जाहिर झाला आहे. याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे. 2 ऑक्टोबर, 2020 (स्वच्छ भारत दिवस) रोजी राष्ट्रीय सुचना व विज्ञान केंद्र (NIC) जळगाव येथील सभागृहात होणाऱ्या व्हर्चुअल कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी हा पुरस्कार स्वीकारणार आहे.
           
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छ, सुंदर शौचालय अभियान (SSSS) आणि सामुदायिक शैचालय अभियानात (SSA) उत्कृष्ट काम केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राला तीन पुरस्कार जाहिर झाले आहे. यामध्ये कन्हाळगाव, जि. भंडारा या ग्रामपंचायतीस स्वच्छ  सुंदर  शौचालय अभियान (SSSS) मधील व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. तर बोरी खुर्द, जि. यवतमाळ या ग्रामपंचायतीस सामुदायिक शौचालय अभियानतंर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दलही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे व पुरस्कार प्राप्त गावांतील ग्रामस्थांचेही अभिनंदन करुन कौतूक केले आहे.

Protected Content