नर्सरीतील २५ मुलांना नाश्त्यातून विष

पेइचिंग: वृत्तसंस्था । चीनमध्ये एका शिक्षिकेने नर्सरीतील २५ मुलांना नाश्त्यातून विष दिले होते. तिला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. या २५ मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाला होता. या शिक्षिका वांग यून हिला हेनान प्रांतातील जिआओजू परिसरातून अटक केली होती. सकाळी नाश्ता दिला होता. ते खाल्ल्यानंतर मुले आजारी पडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला होता.

या शिक्षिकेचे आपल्या सहकाऱ्याशी बाचाबाची झाली होती. त्याचा सूड घेण्यासाठी तिने मुलांना दिलेल्या नाश्त्यामध्ये विषारी पदार्थ मिसळला होता. गेल्या वर्षी २७ मार्च रोजी ही घटना घडली होती. जिआआजूच्या कोर्टाने हा निकाल दिला.

मुलांना नाश्ता दिल्यानंतर मुलांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि काही जण बेशुद्ध झाले. या घटनेची चौकशी केली असता, शिक्षिकेने २५ मुलांना विष दिले होते. ते सर्व जण आजारी पडले होते. त्यातील एका मुलाचा १० महिन्यानंतर मृत्यू झाला. कोर्टाने निकाल दिला असून, दोषी शिक्षिकेला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Protected Content