जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा पोलीस दलातील १२ कर्मचार्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले असून आज पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलिस दलात सेवेत असलेल्या १२ कर्मचार्यांना पोलिस महासंचालक पदक शनिवारी जाहिर करण्यात आले. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणार्या कर्मचार्यांना हे पदक दिले जाते. जिल्ह्यात १२ पोलिस कर्मचार्यांना महासंचालकांकडून पदक जाहीर झाले.
यात फैजपूरचे उपअधीक्षक कुणाल सोनवणे, हेड कॉन्स्टेबल संतोष गुलाब सुरवाडे, मेघना मधुसूदन जोशी, गणेश शांताराम काळे, रवींद्र भगवान पाटील, रवींद्र फत्तू वंजारी, प्रवीण दगडू पाटील (जळगाव), नंदकिशोर बाबूराव सोनवणे (भुसावळ), संदीप सुरेश चव्हाण (भुसावळ), हेमंत पौलाद शिरसाठ (चाळीसगाव), शरद तुकाराम पाटील (अमळनेर), दिलीप चिंचोले यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज पोलीस परेड ग्राऊंडवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांनी पोलीस पदक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.