ग. स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती : सहकारला सर्वाधीक जागा, मात्र बहुमत हुकले !

जळगाव-राहूल शिरसाळे/संदीप होले | सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग. स. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीतून कोणत्याच पॅनलला बहुमत मिळालेले नाही. यात प्रगती पॅनलने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारल्याने सत्तेच्या चाव्या या पॅनलच्या हातात आल्याचे दिसून येत आहे. तर सत्ता स्थापन करण्यासाठी पडद्याआड घडामोडी गतीमान होणार असल्याचेही दिसून येत आहे. जाणून घ्या ग. स. सोसायटी निवडणुकीचा अंतिम अचूक निकाल.

ग.स.सोसायटीच्या २१ जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात चुरस दिसून आली. यात २१ जागांसाठी पाच पॅनलच्या माध्यमातून तब्बल ११५ उमेदवार उभे असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार ? या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमिवर, याची मतमोजणी शनिवार दिनांक ३० एप्रिल रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. पहिल्यांदा मतमोजणी वेगाने होईल असे मानले जात असतांना सुरवात संथ गतीने झाली. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

यात प्रारंभी मतपेटीतील मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात आले. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्ह्याचे उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सर्व निकाल हे एकाच वेळी जाहीर करण्यात येतील अशी घोषणा दिल्याने उपस्थित हिरमुसले. यानंतर प्रदीर्घ काळ चालणारी मतमोजणी ६८ टेबलांवर सुरू झाली. यातील काही फेर्‍यानंतर स्वत: संतोष बिडवई यांनी सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची माहिती जाहीर केली. मात्र मतमोजणी अगदी पहाटे उशीरापर्यंत चालल्याने या ठिकाणी अतिशय आळसावलेले वातावरण दिसून आले. यातच विविध फेर्‍यांमधून कधी कुणी आघाडीवर तर कुणी पिछाडीवर जात असल्याने थोडे गोंधळाचे वातावरण निर्मिती झाले. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

रात्री आठ वाजेपासूनच ग. स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत मिळाले. आणि अंतिम निकालातून ही बाब सिध्द झाली. पहाटे चार वाजेच्या सुमारास अंतीम निकाल जाहीर करण्यात आला. यात सहकार पॅनलला सर्वाधीक नऊ जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी आवश्यक असणार्‍या दोन जागा त्यांना कमी पडल्या आहेत. तर त्यांना आव्हान देणार्‍या लोक सहकार पॅनल व प्रगती पॅनल यांना प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे ग.स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती निर्माण झालेली आहे.

यात प्रत्येक विभागात नेमके कोण उमेदवार विजयी झालेत याची माहिती जाणून घेऊया. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

राखीव

१ ) अनुसूचित जात प्रवर्ग : विजय पवार ( प्रगती पॅनल )

२) अनुसूचित जमाती/व्हीजेएनटी : ए.टी. पवार ( प्रगती पॅनल )

३) ओबीसी राखीव : रावसाहेब मांगो पाटील ( प्रगती पॅनल )

महिला राखीव

४) प्रतीभा सुर्वे ( सहकार पॅनल )

५) सौ. रागिणी किशोरराव चव्हाण ( लोकसहकार पॅनल )

स्थानिक मतदारसंघ

६) उदय मधुकर पाटील ( सहकार पॅनल )
७) अजबसिंग पाटील (सहकार पॅनल )
८) सुनिल सुर्यवंशी (लोकसहकार पॅनल )
९) मनोज माळी (प्रगती पॅनल )
१०) योगेश सनेर (प्रगती पॅनल )

बाहेरील मतदारसंघ

११) अजय सोमवंशी (लोकसहकार पॅनल )
१२) महेश पाटील (सहकार पॅनल )
१३) रविंद्र सोनवणे (लोकसहकार पॅनल )
१४) भाईदास पाटील (सहकार पॅनल )
१५) ज्ञानेश्वर सोनवणे (लोकसहकार पॅनल)
१ ६) योगेश इंगळे (सहकार पॅनल )
१७) अनिल गायकवाड (लोकसहकार पॅनल )
१८) अजय देशमुख (सहकार पॅनल )
१९) विश्वास पाटील (सहकार पॅनल )
२०) निलेश पाटील (प्रगती पॅनल )
२१) मंगेश भोईटे (सहकार पॅनल)

यानुसार आज पहाटे निकाल लागले आहेत. यामुळे या निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसून त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तर सत्तेच्या चाव्या या सहा जागा पटकावणार्‍या प्रगती पॅनलच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिकडे प्रगती जाणार तिकडे सत्ता असे समीकरण आज दिसून येत आहे. तथापि, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या प्रसंगी अजून काही वेगळे समीकरण निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

Protected Content