जळगाव (प्रतिनिधी )- पिंप्राळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले असून जळगाव जिल्ह्यात सर्वांचा शिवसेनेकडे ओढा वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देऊन शिवसेनेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.
शहरातील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात निलेश पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. याप्रसंगी फटाक्यांची जोरदार आतषबाजी आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी निलेश पाटील व त्यांच्या सहकार्यांचे स्वागत केले. त्यांच्या पक्षातील प्रवेशामुळे पिंप्राळा आणि परिसरात शिवसेना मजबूत होईल असा आशावाद पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या दिलेल्या मूलमंत्राला प्रमाण मानून निलेश पाटील व इतरांनी वाटचाल करावी. शिवसेनेची ध्येयधोरणे व विचार तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली लोक कल्याणकारी कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विधानसभा संपर्क प्रमुख प्रा. समाधान पाटील, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, फरीद मुशीर खान, अजीज बाबा, प्रशांत कुळकर्णी, इल्यास सर, फिरोज पिंजारी, मंजुर पटेल, आबीद शेख, साहिल शाह ,इरफान शेख, दाऊद शेख, शाहिद खान, गुड्डू मणियार, नजीर शेख, अरबाज शहा, आर्या खान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/429756335413587