जळगाव प्रतिनिधी । युवा सप्ताहानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त केंद्र शासनातर्फे दरवर्षी १२ ते १९ जानेवारी या कालावधीत युवा सप्ताह साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे युवा सप्ताहाचे आयोजन केले आहे.
यातील युवा सप्ताहात पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता एकलव्य क्रीडासंकुल येथे उदघाटनानंतर स्वामी विवेकानंद यांचे कार्य, तत्वज्ञान व विचार या विषयावर व्याख्यान होईल. १३ जानेवारीला सकाळी ११ वाजता एकलव्य क्रीडासंकुल येथे निबंध स्पर्धा तर दुपारी १ वाजता लोकशाही बळीकटीत माझी भूमिका या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता ऑनलाइन सूर्यनमस्कार स्पर्धा होईल. १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता बहिणाबाई माध्यमिक विद्यालय येथे चित्रकला स्पर्धा, १६ जानेवारीला भाऊसाहेब राऊत विद्यालयात दुपारी १२ वाजता दिनेश पाटील युवकांना मार्गदर्शन करतील. १७ रोजी राऊत विद्यालयात दुपारी १२ वाजता यशस्वी व्यक्तींचे अनुभव, १८ रोजी दुपारी १२ वाजता नूतन मराठा महाविद्यालयात युवकांसाठी मार्गदर्शन तर १९ रोजी दुपारी १ वाजता खुबचंद सागरमल विद्यालयात युवा सप्ताह कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.