शिष्याची गुरुवर निष्ठा असावी –हभप गजानन महाराज

 

चोपडा, प्रतिनिधी । पतिव्रता स्त्रीची आपल्या पतीवर जेवढी निष्ठा असते तेवढीच निष्ठा शिष्याची आपल्या गुरूवर असावी असे प्रतिपादन हभप गजानन महाराज चौगावकर यांनी आपल्या कीर्तनात केले. श्रीराम नगर चोपडा येथे आयोजित कीर्तन सप्ताहात आपल्या कीर्तनात ते बोलत होते.

हभप गजानन महाराज यांनी ज्ञानोबा माऊली- निवृत्तीनाथ ,गोरक्षनाथ-मच्छिन्नद्रनाथ, स्वामी विवेकानंद-रामकृष्ण परमहंस आणि जगद्गुरू तुकोबाराय-निळोबाराय या गुरू शिष्याच्या जोडीचे उदाहरण देऊन शिष्याचे गुरुवरील निष्ठेचे महत्व कीर्तनद्वारे विशद केले. याप्रसंगी के. डी. चौधरी यांनी स्वागत केले. कार्यक्रमला जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, आदित्य पाटील यांनी पूर्ण वेळ कथेचा लाभ घेतला. त्यांचा सत्कार करण्यात आला. हभप अशोक महाराज बापू महाराज, गोपीचंद महाराज, मोतीराळे सर, बागुल महाराज, शुभम महाराज सह असंख्य श्रोते उपस्थित उपस्थित होते.

Protected Content