जळगावच्या हप्तेखोर नगरसेवकांवर कारवाई करा ! : अ‍ॅड. पाटील (व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेशी कोणताही संबंध नसणार्‍या सुनील झंवरच्या कार्यालयात वॉटरग्रेस कंपनीची कागदपत्रे आढळणे ही अतिशय गंभीर बाब असून यात दरमहा १५ हजारांचा हप्ता घेणार्‍या नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख हा त्या पेक्षाही भयंकर आहे. यामुळे त्या हप्तेखोर नगरसेवकांची चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी लेखी अर्ज देखील दिला आहे.

बीएचआर प्रकरणात अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी न्यायालयीन लढा देण्याची तयारी केली आहे. या अनुषंगाने त्यांनी सुनील झंवर याच्या कार्यालयात वॉटरग्रेस कंपनीची आढळून आलेली कागदपत्रे हा अतिशय गंभीर विषय असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, महापालिकेशी कोणताही संबंध नसतांना ही कागदपत्रे सापडणे अतिशय गंभीर आहे. यासोबत याच कागदपत्रांमध्ये जळगावातील काही नगरसेवकांना १५ हजार रूपये महिना हप्ता मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Jalgaon Bhr Scam)

वॉटरग्रेसच्या ठेक्यामुळे जळगावातील स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनला असतांनाच कुणीही नगरसेवक यावर आवाज उठवतांना दिसत नाही. प्रत्येक महिन्याला १५ हजार भेटत असल्यामुळे हा प्रकार घडत असावा. यामुळे आपण वॉटरग्रेस व सुनील झवर यांचा संबंध आणि दरमहा १५ हजार रूपये घेणारे हप्तेखोर नगरसेवकांची चौकशी करावी म्हणून लेखी तक्रार केली असल्याची माहिती अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी दिली आहे.

खालील व्हिडीओत पहा विजय भास्कर पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1193672084363656

Protected Content