शिवसेनेतर्फे महाआरती करून देवालये उघडण्याचे स्वागत ( व्हिडीओ )

जळगाव राहूल शिरसाळे । राज्य सरकारने देवालये उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आज महानगर शिवसेनेतर्फे महाआरती करण्यात आली.

शिवसेना महानगर तर्फे आज दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून आरती करून पेढे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया, अमित जगताप, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मंगला बारी, ज्योती शिवदे, मनीषा पाटील, चित्रा मालपाणी, पद्मावती राणा, सविता कोलते आदी उपस्थित होते.

खालील व्हिडीओजमध्ये पहा महाआरतीबाबतचा वृत्तांत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/720852538519839

https://www.facebook.com/508992935887325/videos/4359479537414130

Protected Content