सरदार वल्लभभाई पटेल चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन ( व्हिडीओ )

जळगाव संदीप होले । येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे शहरातील सागर पार्क मैदानावर सरदार वल्लभभाई पटेल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.

आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी महापौर ललीत कोल्हे, भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे, डॉ. कृष्णा पाटील, नगरसेवक डॉ. विरन खडके, चंद्रकांत महाजन, किशोर महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सरदार वल्लभभाई पटेल चषक ही स्पर्धा शहरातील सागर पार्क मैदानावर खेळवली जात आहे. यात जिल्ह्यातील २४ संघांचा सहभाग असून यातील १२ संघ जळगाव शहरातील तर उर्वरित १२ संघ ग्रामीण भागातील आहेत. यातील विजेत्यांना चषकांसह आकर्षक पारितोषीके देण्यात येणार आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ,अभिजीत महाजन, अ‍ॅड. पुष्कर नेहेते, अमोल धांडे, सिंचन सरोदे, चंदन कोल्हे, भूषण बढे, हितेंद्र धांडे, प्रवीण चौधरी, लीलाधर खडके, महेश चौधरी ,स्वनिल नेमाडे, सुनील भारंबे, राहुल चौधरी, शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी मिलिद तळेले आदींचे सहकार्य लाभत आहे.

खालील व्हिडीओत पहा क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/105228741489823

Protected Content