पोलीस कर्मचार्‍याच्या घराला आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या नवीन वसाहतीच्या ३ नंबरच्या इमारतीत सातव्या मजल्यावर एका पोलीस कर्मचार्‍याच्या घराला आग लागल्याची घटना घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, पोलीस अधीक्षक कार्यालयात नवीन वसाहतीच्या ३ इमारतीत सातव्या मजल्यावर खोली क्रमांक ७० २ येथे पोलीस कर्मचारी ईश्वर पंडीत पाटील हे वास्तव्याला आहेत. ते स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. ते काल घर बंद करुन बाहेर गेले होते. यादरम्यान रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर पडल्याचे त्यांच्या शेजारी राहणार्‍या नागरिकांना दिसून आले. त्यांनी हा प्रकार ईश्वर पाटील यांना कळविला. त्यानुसार ईश्वर पाटील घरी परतले.

घराचा दरवाजा उघडताच प्रचंड धूर बाहेर निघाला. त्यानंतर फायर इस्टींगव्युशरच्या तसेच शेजारच्या नागरिकांनी पाण्याचा मारा घरात आग विझविली. घरात गणपती जवळ लावलेल्या दिव्यामुळे गणपतीभोवती केलेल्या सजावटीच्या साहित्याने पेटल घेतला. यामुळे हॉलमधील साहित्याला आग लागली. यात टीव्ही, लाकडी कपाट, शिलाई मशीन अशा संसासरपयोगी वस्तू जळून नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. दरम्यान नवीन इमारत असतांनाही याठिकाणची आगीची सूचना देणारी यंत्रणा बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी ती तातडीने ती कार्यान्वित करावी अशीही मागणी होत आहे.

Protected Content