पाडळसरे येथील बाप्पाला निरोप

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसरे येथील “एक गाव एक गणपतीची” वाजत गाजत उत्स्फूर्तपणे मिरवणुक काढून ७ व्या दिवशी विसर्जन करण्यात आले.

तालुक्यातील तापी नदीकाठी असलेल्या पुनर्वसित पाडळसरे गावात पोलीस अधीक्षक डॉ. प्रविणकुमार मुंडे यांच्या “एक गाव एक गणपती” या संकल्पनेला साद देत तिरंगा गणेश मित्र मंडळाने एक गाव एक गणपतीची स्थापना करून ई-पीक पाहणी, पी. एम. किसान, ई-केवायसी आदी बाबत जनजागृतीपर बॅनर बनवून ग्रामीण भागातील महत्वपूर्ण घटक असलेल्या शेतकऱ्यात जागृतीचा नवा आदर्श निर्माण केला. त्याचे कौतुक म्हणून मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने यांनी स्वतः येऊन येवून तिसऱ्या दिवसाची आरती केली.

यावेळी गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेऊन गणेश विसर्जन वेळी निर्माल्य व मूर्ती संकलत करण्यासाठी संकल्प केला. आज ७ व्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य लावून मिरवणूक काढण्याआधी बंदोबस्तातील पोलीस हवालदार मुकेश साळुंखे पोलीस कर्मचाऱ्यांना आरतीचा मान देत सामूहिक आरती करून विसर्जन मिरवणुकिला सुरुवात केली. यावेळी सजविलेल्या मिनी ट्रॅक्टर वरून गणेश मूर्ती विराजमान करून गावातील घराघरातुन आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी ७ वाजता मुख्य रस्त्यावरून सुरू झालेली मिरवणूक चौका चौकात थांबवून महिलांना आरतीचा मान दिला.

सलग दोन वर्षे झाली कोरोनामुळे बंद असलेल्या सण उत्सवमुळे सर्व ग्रामस्थ नवं तरुण तरुणी उत्साहाने सहभागी होत ग्रामीण व पारंपरिक नृत्य सादर केले. मिरवणुकीत तरुणांचा उत्साह वाढवणारी सांप्रदायिक व देशभक्तीपर गीते वाजवून उत्साहात अधिक भर पडली. गणेश विसर्जन मिरवणुक हनुमान मंदिर प्रांगणात येवून गणपती बाप्पाला जड अंतकर्णाने निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणून जयघोष करण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुक उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी तिरंगा गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content