चार महिन्यानंतर तरूणीच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेतला होता. परंतू तरूणीने धमकी व त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी १० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैय्यद इसरतबी सिकंदर अली (वय-१८) रा.अमळनेर असे मृत तरूणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद इसरतबी सिकंदर अली ही तरूणी ही आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. १४ ऑगस्ट रोजी तिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेमुळे तिचे आई व वडील यांना प्रचंड धक्का बसला होता. तिने आत्महत्या का केली यांची माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांना मयत सैय्यद इसरतबी सिकंदर अली हिच्या मैत्रिणीकडून समजले की, यावल तालुक्यातील फैजपूर येथील फरहान खान फिरोज खान (वय-२२) हा मुलीशी फोनवर बोलत होते. त्यानंतर त्याने तरूणीकडे पैशांची मागणी केली होती. तसेच पैसे दिले नाही तर बरे वाईट करून देण्याची धमकी दिली होती. तसेच फरहान याचे नातेवाईक यांनी देखील तरूणीला शिवीगाळ व धमकी देत होते. हा प्रकार मृत तरूणीचे वडील सिकंदर अली मोहंमद अली यांना लक्षात असल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी १० जानेवारी रेाजी रात्री ८ वाजता संशयित आरोपी फरहान खान फिरोज खान, फिरोज खान यासिन खान, कश्मीरा शेख कामील आणि अलमासबी अमीरखान सर्व रा. फैजपूर ता. यावल यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

Protected Content