जळगाव प्रतिनिधी । नोबेल फाउंडेशन व भरारी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती. याचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यात ५७ विद्यार्थ्यांची विनामूल्य इस्रो सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.
नोबेल फाउंडेशन व भरारी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा गेल्या वर्षी घेण्यात आली होती. राज्यभरातून ५२०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३१९ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली होती. त्यातून ५७ विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झालेली आहे. यात जळगाव येथील ओरियन सीबीएससी स्कूलचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी करुणेश मधुकर महाजन राज्यात प्रथम आला आहे. तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात सेंट मेरी स्कूल अमळनेरचा विद्यार्थी हिमांशू निरंजन पेंढारे गुणवत्ता यादीत प्रथम आलेला आहे. य
ा विद्यार्थ्यांना नोबेल फाऊंडेशनतर्फे इस्रो अहमदाबाद, आयआयटी गांधीनगर व आयआयएम अहमदाबाद या सर्वोच्च शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना अभ्यास सहलीसाठी नेण्यात येणार आहे. यंदा नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा जून महिन्यात होणार असून अर्ज भरण्यास १० मार्चपासून सुरूवात होणार असल्याची माहिती संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.