Home Cities मुक्ताईनगर श्रीराम मंदिर निर्माणासाठी खडसे परिवारातर्फे निधी प्रदान

श्रीराम मंदिर निर्माणासाठी खडसे परिवारातर्फे निधी प्रदान

0
54


मुक्ताईनगर प्रतिनिधी । अयोध्या येथे उभारण्यात येणार्‍या भव्य श्रीराम मंदिरासाठी खडसे परिवारातर्फे १ लाख २२ हजार रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे.

तालुक्यातील सालबर्डी व कोथळी येथील श्रीराम मंदिरात विश्‍व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम मंदिर निधी संकलनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे व भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी खडसे परिवाराने मंदिरासाठी १ लाख २२ हजारांचा निधी दिला.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले, माजी सरपंच नारायण चौधरी, उमेश राणे, रघुनाथ चौधरी, तृृृप्ती राणे, तुषार राणे, कुणाल सोनार, जितेंद्र जाधव, दिनेश चव्हाण, पूनम झोपे, श्रद्धा झांबरे, शंकर जंगले, ललित खडसे, प्रभाकर झोपे, रमेश खाचणे, दामोदर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Protected Content

Play sound