जळगाव प्रतिनिधी । पुणे-जळगाव-इंदूर या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो आणि एयर इंडिया या दोन कंपन्यांनी रस दाखविला आहे.
जळगावमार्गे पुणे ते इंदूर ही दोन शहरे विमानसेवेेने जोडले जाणार असून त्यासाठी इंडिगो व एअर इंडिया या दोन विमान कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गेल्या महिन्यात खासदार उन्मेष पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार प्रक्रिया सुरू झाल्याचेे विमान प्राधिकरणाचे चेअरमन हरदीपपुरी सिंग यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी खासदार उन्मेष पाटील यांनी विमान प्राधिकरणाचे चेअरमन हरदीपपुरी सिंग यांना पत्राद्वारे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार या दोन्ही शहरांना विमानसेवा देण्यासाठी पाच सहा कंपन्यांशी संपर्क केला. त्यातील इंडिगो व एअर इंडिया या दोन विमान कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या कंपन्यांशी पुढील बोलणी सुरू असल्याची माहिती पत्राद्वारे चेअरमन पुरी यांनी कळवली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news