राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्षपदी मंगला पाटील

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षपदी मंगला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुंबई येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलीकडे अंतर्गत कलह वाढल्याचे दिसून येत आहे. एकनाथराव खडसे हे आपल्या समर्थकांसह पक्षात आल्यानंतर कार्यकारणीत फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच महिला महानगराध्यक्षपदाचा तिढा देखील अद्यापपर्यंत कायम होता. अखेर या पदावर मंगला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुंबई येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रीया सुळे, महिला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर आदींची उपस्थिती होती.

मंगला पाटील यांनी आधी देखील महिला महानगराध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. यानंतर आता त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. विशेष करून त्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून गुलाबराव देवकर यांना पक्षाने प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.