Home Cities जळगाव एलसीबीच्या निरिक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

एलसीबीच्या निरिक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

0
77

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात एलसीबीचे निरिक्षक किरणकुमारे बकाले यांची रात्री उशीरा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस दलात एलसीबीचा दरारा हा कुणापासून लपून राहिलेला नाही. जिल्ह्यात कुठेही कारवाई करण्याच्या विशेषाधिकारामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुखपद हे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते. याच पदावर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कार्यरत असणारे निरिक्षक किरणकुमार बकाले यांची रात्री उशीरा अचानक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. किरणकुमार बकाले यांची इतक्या तातडीने बदली नेमकी कशामुळे करण्यात आली याचे कारण मात्र समजले नाही. तर, आता त्यांच्या जागी नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता लागली आहे.


Protected Content

Play sound