जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | किरणकुमार बकाले यांची एलसीबीच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार किसनराव नजन पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे एलसीबीचे तत्कालीन प्रमुख किरणकुमार बकाले हे अडचणीत आले आहेत. त्यांना निलंबीत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर एलसीबीच्या प्रमुखपदाची धुरा कुणाकडे जाणार याबाबत उत्सुकता लागून होती.
या पार्श्वभूमिवर, सध्या पाचोरा पोलीस स्थानकात कार्यरत असणारे निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडे एलसीबीच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी हे आदेश काढले आहेत.