Home Cities जळगाव होय, गुलाबभाऊ बिग बॉसमध्ये जाण्यास तयार !

होय, गुलाबभाऊ बिग बॉसमध्ये जाण्यास तयार !

0
35

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपण मराठी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याचे वक्तव्य केले आहे.

मराठी बिग बॉस या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच सुरू होत असून यात नेमके कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाचे होस्ट तथा अभिनेते महेश मांजरेकर यांच्या एका वक्तव्याने ही उत्सुकता वाढीस लागली आहे. मांजरेकर यांना या शो मध्ये कोणते राजकारणी असावेत ? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव घेतले. पाटील यांचे उत्कृष्ट वक्तृत्व आणि विनोदबुध्दीमुळे ते बिग बॉसमध्ये हवेत असे ते म्हणाले.

दरम्यान, याबाबत ना. गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला बिग बॉस या कार्यक्रमात जायला आवडेल असे सांगितले. ते म्हणाले की, मी शाळा व कॉलेजात एकपात्री प्रयोग, नाटक, गाणी आदी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. यामुळे मला जर संधी मिळत असेल तर मराठी बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबभाऊंनी याप्रसंगी केले.


Protected Content

Play sound