खडसे महाविद्यालयात गरबा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.19 ते 24 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये गरबा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हेमंत महाजन यांच्या हस्ते करण्यात येऊन सदर दिनांक पासून महाविद्यालयातील निवडक 50 विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका दहा एकूण एकूण 60 सहभागींनी सदर प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला. वरील कार्यशाळेला मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून महाविद्यालयातील क्रीडा संचालिका व विद्यार्थी विकास विभागाच्या महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रतिभा ढाके यांनी जबाबदारी स्वीकारून वरील सर्व विद्यार्थिनी व प्राध्यापिका यांना गरबा या कला प्रकाराचे प्रशिक्षण दिले.

दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी वरील विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी व प्राध्यापिका यांची वेशभूषा सहित प्रात्यक्षिक गरबा प्रशिक्षणाचे घेण्यात आले. त्यामध्ये उत्कृष्ट वेशभूषा असणाऱ्या प्रथम द्वितीय आणि तृतीय यांना पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट सादरीकरण ज्यांनी केले त्यांना सुद्धा प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीने पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तद्वतच महिला प्राध्यापिकांमध्ये ज्यांनी उत्कृष्ट वेशभूषा केली त्यांनाही सन्मानित करण्यात आले व ज्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले त्यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पारितोषिक वितरणासाठी डॉ. सी .एस. दादा चौधरी त्याचप्रमाणे मा. पुरुषोत्तम भाऊ महाजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच .ए. महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सदर कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे त्याचप्रमाणे विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके व विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी निखिल यमनेरे, निखिल रायपुरे, शितल भोई या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन सदर कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडली. सदर कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यीनींना व प्राध्यापिका यांना सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Protected Content