वॉटरग्रेसचा ठेका रद्द करून गुन्हा दाखल करा : काँग्रेसची मागणी

जळगाव प्रतिनिधी । वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या वॉटरग्रेस कंपनीला जळगाव महापालिकेने दिलेला ठेका रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी केली आहे.

शहर काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहून वॉटरग्रेस कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीचा शहरात ठेका सुरू झाल्यापासून कामाबाबत असमाधान व्यक्त करत तक्रारी करण्यात आल्या आहेत. अवघ्या सहा महिन्यात ठेकेदाराने काम बंद केले होते. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट २०२० पासून कामाला सुरुवात केली आहे. बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने धाडसत्र राबवले होते. त्यात उद्योजक सुनील झंवर यांच्याकडे वॉटरग्रेस कंपनीचे दस्तऐवज सापडले असून एटीएम मिळून आले आहेत. झंवर हे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी व पदाधिकारी देखील नाहीत त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, सफाईचा ठेका हा साई मार्केटिंगकडून चालवला जात असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची व ठेक्याशी संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. वॉटरग्रेस कंपनीने महापालिकेसोबत केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करून ठेका पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करत अनामत रक्कम जप्त करण्याची मागणी देखील या पत्रात घोडेस्वार यांनी केली आहे.

 

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

 

Protected Content