Home Cities जळगाव जळगावात मुस्लीम समुदायातर्फे दहशतवादी हल्ल्याचा निषेध (व्हिडीओ)

जळगावात मुस्लीम समुदायातर्फे दहशतवादी हल्ल्याचा निषेध (व्हिडीओ)

0
44

जळगाव । शहरातील मुस्लीम समुदायाने पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आज तीव्र निषेध करून पाकला धडा शिकवण्याची मागणी केली.

पुलवामा येथील हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या अनुषंगाने शहरातील अल्पसंख्यांक समुदायाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. बावा चौकात मुस्लीम समुदायातर्फे या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, माजी उपमहापौर करीम सालार, कैलासाआप्पा सोनवणे, नदीम मलीक, नासिर शेख, मुकुंदा सोनवणे, अयाज शेख, इफ्तेखार शेक यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी पाकविरोधी घोषणा देऊन या देशाला धडा शिकवण्याची मागणी केली.

पहा– पुलवामा हल्ल्याबाबत मुस्लीम समुदायाने केलेला निषेध.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound