जळगाव प्रतिनिधी । अँग्रोवर्ल्ड व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य कृषी प्रदर्शनात आज जिल्ह्यातील 17 प्रगतीशिल शेतकरी, संस्था, अधिकारी यांचा सन्मान मान्यवर यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.सी.बाफना हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे श्रीकांत झांबरे, स्वप्नील चौधरी, जिल्हा कृषी अधिकारी मधुकर चौधरी, ॲग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, नंदीनीबाई बेंडाळेचे प्राचार्य सी.एम.पाटील आदी उपस्थित होते.
या शेतकऱ्यांचा झाला सत्कार
कडू अप्पा पाटील (किनगाव), डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर संस्था, पाल केव्हीसी विभाचे महेश महाजन, कृषी पर्यटन म्हणून प्रमोद बऱ्हाटे जळगाव, गुणवंत सोनवणे पाणी फाऊंडेशन चाळीसगाव, निलेश राणे पाणी फाऊंडेशन पारोळा, मधुकर नारायण पाटील सुनसगाव जामनेर, मारोतराव व्यंकटराव पाटील उमगरी जि. नांदेड, समाधान रतन पाटील आव्हाने, संघरत्न शालीग्राम गायकवाड एरंडोल, आर.ए.पाटील चोपडा, कृषी सहाय्यक दिनेश पाटील, मालखेडा शेतकरी लिलाधर पाटील, जगन्नाथ रामभाऊ दिवाण रा. गेवराई जि.बीड, वरिष्ठ संशोधक डॉ. मधुकर बेडीस, शेतकरी समाधान भिकन पाटील किनगाव आणि मयुर अरूण वाघ बांबरूड राणीचे ता.पाचोरा यांचा सत्कार करण्यात आला.