जळगाव जिल्ह्यात दुकानाचे शोरुम फोडून चोरी करणारी टोळी जेरबंद

crimeeee

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या शो रूम फोडून लाखो रूपयांचा मुद्देमाल व रोकड लंपास करणारी टोळीचा पर्दाफास झाला असून यात पाच जणांना अटक करण्यात आले आहे. यातील दोन संशयित अल्पवयीन आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीसांच्या गुप्त माहितीनुसार, सोनु नागुलाल मोहीते (वय- 21) रा. वापी, गुजरात ह.मु. विचवा ता. बोदवड, राहुल कमल मोहीते (वय-20) रा. वापी, गुजरात, ह.मु. बाळगंगा भोलात कॉलनी इंदोर आणि बाळु शामलाल चव्हाण (वय-25) रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ, तसेच दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. याप्रकरणी त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान यातील सोनू मोहिते आिा राहुल मोहिते हे गुजरात व मध्यप्रदेश राज्य येथील सराईत आरोपी आहेत. त्याच्या ताब्यातील सोन्याचांदीचे दागिने व पल्सर मोटार सायकल तसचे गुन्ह्यात वापरण्यात आलेले 2 टॉमी, स्कू ड्रायव्हर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या गुन्ह्यांची दिली कबुली
1) उषा मोटर्स , रॉयल इन्फील्ड (बुलेट मो.सा.) शोरुम जळगाव गुन्हा दि. 25/11/2019 रोजी , 2) सरस्वती फोर्ड, शोरुम, नशिराबाद, दि. गुन्हा दि. 25/11/2019 रोजी, 3) राम होंडा , शोरुम भुसावळ गुन्हा दि. 25/11/2019 रोजी, 4) हिरो चौधरी मोटर्स , भुसावळ गुन्हा दि. 25/11/2019 रोजी, 5) डिस्को टॉवर्स , भुसावळ ( टिव्ही , फ्रिज शोरुम) गुन्हा दि. 25/11/2019 रोजी, 6) मानराज, मारुती मोटर्स, शोरुम जळगाव दि. 17/12/2019 गेला माल 4 लाख रु. रोख, 7) महेंद्रा , शोरुम, नशिराबाद ( बच्छाव मोटर्स ) दि. 21/12/2019 गेला माल 1 लाख 51 हजार रु. रोख., 8) पंकज, टी. व्ही. एस. शोरुम दि. 17/12/2019. गेला माल रोख रु. 9 हजार .

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी यांनी सफौ. अशोक महाजन, पोह. रविंद्र पाटील,विजय पाटील, नरेंद्र वारुळे, सुधाकर अंबोरे, अनिल जाधव, दादाभाऊ पाटील, दिपक पाटील, आशरफ शेख, कमलाकर बागुल, शरिफ काझी, वैशाली सोनवणे, प्रमोद लाडवंजारी, गफुर तडवी, चालक दर्शन टाकणे, अशोक पाटील, अशांचे पथक नेमले होते.

Protected Content