जळगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी देवतांची बदनामी करणारा व्हिडिओ धुळ्यातील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेचा निषेध तसेच अशीच परिस्थिती जळगावात निर्माण होऊ नये, म्हणून आज गोलाणी मार्केट दुपारी १२ ते २ या वेळेत बंद ठेवण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, धुळ्यातील सोशल मीडियात हिंदू देवदेवता आणि माता-भगिनींविषयीची समाज माध्यमांवर आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित करीत निर्माण करण्यात आलेली जातीय तेढ. हिंदू धर्म संरक्षक, संघटक, प्रचारक, गोरक्षकांवर निर्दयी कारवाईच्या निषेधार्थ जळगावातही प्रातिनिधिक स्वरुपात निषेध म्हणून काही व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून दुपरी १२ ते २ या दोन तासांसाठी गोलाणी मार्केट बंद ठेवले. यावेळी सर्व व्यापारी बंधूनी सहकार्य करत शांततेत बंद पाळत आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2134114596711980/?t=42