जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला क्रीडा स्पर्धेत जळगाव कोल्हापूर पालघर मुंबई धुळे पुणे नागपूर यवतमाळ उप उपांत्य फेरीत पोहोचले असून बुधवार सकाळच्या सत्रात उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार आहे. ते सामने याप्रमाणे खेळवले जातील कोल्हापूर विरुद्ध पालघर, मुंबई विरुद्ध धुळे, जळगाव विरुद्ध पुणे, नागपूर विरुद्ध यवतमाळ. सकाळी साडेसात ते बारा वाजेपर्यंत या स्पर्धा होत आहे.
मंगळवारी झालेल्या स्पर्धेचा निकाल
कोल्हापूर विजयी विरुद्ध नाशिक ७-० , मुंबई विवी ठाणे २-०, जळगाव विवी अमरावती २-०, नागपूर विवि बीड ५-०, पुणे विवि लातूर ११-०, धुळे विवि सांगली २-०, पालघर विवि बुलढाणा ४-०.
मंगळवार स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू रिया पठाण, नाशिक. आयशा सरतापे ठाणे. जानवी देशमुख अमरावती, ज्ञानेश्वरी पाटील बीड, अवनी गांगुळे लातूर, जेसीका पाटील सांगली, आराध्या डोंगरे बुलढाणा ठरले.
ठेकेदार निलेश पाटील, डॉक्टर चित्ते ,सौ मृणाली चित्ते ,शलाका जमदार, गुलाब शाह अन्सारी, सौ कांचन नारखेडे, सलीम परकोटे,एडवोकेट अमजद पठाण,पाचोरा, डॉ शृति रुपरेलिया,डॉ खुशबू कथारिया,डॉ स्नेहल तिवारी (फीजीओ) यांच्या हस्ते गौरवण्यात आले.