जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी नुतन जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण यांनी जाहीर केली आहे.
सदरील कार्यकारणीत दहा उपाध्यक्ष,चार सरचिटणीस तसेच अकरा चिटणीस असुन कार्यकारणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्ह्याचा संघटनात्मक समतोल साधल्याचे दिसुन येत आहे.
यात सरचिटणीस पदी जितेंद्र कोळी, संदीप सावळे, संदीप पाटील, पवन पाटील यांची वर्णी लागली आहे तर उपाध्यक्ष म्हणून स्नेहदीप गरुड, सागर भारंबे, मुरलीधर पाटील, भूषण नेहते ,राम आहुजा, मुकेश पाटील, मेघराज नाईक, सोपान झाल्टे, रहस्य महाजन चिटणीस पदी शुभम पाटील, विशाल भोई, भूषण फेगडे, विक्रम वरकड, दीपक पाटील, वैभव राजपूत, जीवन राणे, सुमित बऱ्हाटे, भरत पाटील, अक्षय सरोदे, मयूर बडगुजर तर सोशल मीडिया प्रमुख पदी अजिंक्य वाणी तसेच सदस्य म्हणुन अजय भालेराव, गोपाल बरकले, चंदू ठाकरे, मनोज घाटे, संदीप पाटील, सुनील शिंपी यांची युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर, अजय भोळे, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परीक्षीत बऱ्हाटे, आतिश झाल्टे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.