गळफास घेवून रिक्षाचालकाची आत्महत्या

death penalty hanging

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा येथे राहणाऱ्या रिक्षा चालकाने शहरातील शाहू नगरातील जळकी मिल परीसरात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आधार बुधा पाटील (वय-50) रा. मढी चौक, पिंप्राळा हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शाहुनगर येथील जळकी मील परीसरातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण उद्याप समजले नाही. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. याप्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परीवार आहे.

Protected Content