भाजप अल्पसंख्यांक आघाडीची जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारणी घोषित…

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीची जिल्हा कार्यकारणी नुतन जिल्हाध्यक्ष अजगर खान यांनी नुकतीच जाहीर केली आहे.

यात सरचिटणीस पदी डॉ सादिक सखावतद्दिन व सै मुनाफ अली यांची वर्णी लागली आहे तर उपाध्यक्ष म्हणून शेख रहेमान शेख बाबू ,ए आर काझी, अय्युबखान अश्रफखान, शे.अलीमोद्दीन इक्रामोमुद्दीन, हाजी फहीम, शेख युनूस तसेच चिटणीस म्हणून शे. अजहर शेख रफिक, शेख फरीद शे. अब्बास, हाजी रफिक अजीज, अयफाज बेग फयाज बेग, इमरान शफी तेली, जाबीरखान समशेरखान सदस्य म्हणुन अशरफखान सफदरखान, अमजदखान मुशीरखान ,शेख जमीलोद्दीन, शेख रईस, सै.शहदाब सै.अशपाक, मो खलील मजहर अली, सै.नदिम युनूस अली, अरशदखान इस्माईलखान, शेख हरुण शेख कालू, जावेद खान अफजलखान, कादिरखान फरीदखान, शे. अरबाज शे.अलीमुद्दीन, वसीमखान अफसरखान, हारुणखान तसलीमखान यांची कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, अशोक कांडेलकर, अजय भोळे, हर्षल पाटील, हिराभाऊ चौधरी, डॉ केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, परीक्षीत बर्‍हाटे, आतिश झाल्टे, हरलाल कोळी, वैशाली कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असल्याचे भारतीय जनता पार्टी जळगाव पुर्व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप सुरवाडे यांनी कळविले आहे.

Protected Content