जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज ब्युरो | जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले असून यात मातब्बर राजकारण्यांची प्रतिक्षा पणाला लागली आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक आटोपल्यानंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांची धामधुम सुरू झाली. यात जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असल्याने बाजार समित्यांची निवडणूक ही नेत्यांसाठी अतिशय महत्वाची मानली जाते. दुसर्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना साधारणपणे यात संधी दिली जाते. गेल्या दीड-दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या असल्याने बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस दिसून आली.
जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव, जळगाव ग्रामीण, बोदवड, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, रावेर आदी ठिकाणी मोठी चुरस दिसून आली. यात सर्वाधीक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाचोरा-भडगाव बाजार समितीत दिसून आली. येथे आमदार किशोर पाटील आणि अमोल शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष झाला.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदानास प्रारंभ झाला आहे. यात नेमके कोण बाजी मारणार ? अनेक ठिकाणी राजकीय आणि सहकारातील आगामी वाटचाल ठरणार आहे.