जळगाव प्रतिनिधी । शहरात राकेश कोळी उर्फ लिंबू राक्यावर याच्यावर चार ते पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना 16 ऑक्टोबर रोजी घडली होती. या गुन्ह्यातील तीन जणांना जिल्हा पेठ पोलीसांनी ताब्यात घेतले असून उद्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी की, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश कोळी उर्फ लिंबू राक्या याला तीन ते चार जणांनी मारहाण केली. मारहाणीत संशयितांनी त्याची गळ्यातील चैनही लांबविली होती. जखमी राकेशला जिल्हा रुग्णालयात यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात लिंबू राक्याच्या जबाबावरुन प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. व गणेश सोनार या संशयितास अटक करण्यात आली होती. यातील तीन जण फरार होते. तिघांबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील छगन तायडे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप शिरसाठ, एसआय भटू नेरकर, जितेंद्र सुरवाडे, अविनाश देवरे, अजित पाटील, प्रशांत जाधव, हेमंत तायडे यांच्यासह शहरातून विष्णु गोविंद प्रजापती वय 23 रा.ईश्वर कॉलनी, जगदीश सुकलाल भोई (वय-29), राजू उर्फ काल्या सुकलाल भोई वय 26 दोघे रा. रथचौक या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची सायंकाळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिघांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.