जिल्हा सामान्य रूग्णालयात नियमित ओपीडी सुरू करा : ॲड.जमिल देशपांडे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोविड रूग्णालय बंद करून नियमीत ओपीडी सुरू करण्याची मागणी मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, शहरातील खाजगी दवाखाने आजही पुर्णपणे सुरू झालेले नाहीत, जे सुरू आहेत ते कोणत्याही रूग्णाला दाखल करून घेत नाहीत. कोविड व्यतिरीक्त कोणताही लहानमोठा आजार असेल तर रूग्णाला शहरामधील कोविड रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय शहरापासून २० कि.मी. दुर आहे. शहरातील ऑटोरिक्षा बंद आहेत. पुरेशा अॅम्ब्युलन्स नाही. प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन परीणामी रूग्ण दगावतो आहे या सर्व बाबींचा विचार करता शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाची ओपीडी तातडीने सुरू करावी व शासकीय जिल्हा कोविड रूग्णालय येथुन बंद करावे. शहरात इतर २-३ खाजगी रूग्णालय व साकेगांव येथील उल्हास पाटील मेडीकल कॉलेज शासनाने अधिग्रहीत केले आहेच त्यामध्येच कोविड रूग्णांचा उपचार करावा. गरज पडल्यास आणखी खाजगी रूग्णालये अशी विनंती मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शासकीय जिल्हा कोविड रूग्णालय म्हणजे रूग्णाचा मृत्यू अटळ अशी भावना नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे. येथील गलथान कारभार रोज चव्हाट्यावर येत आहे. पॉझीटिव्ह रूग्णांना सिनिअर डॉक्टर बघतच नाही, त्या रूग्णांच्या वार्ड मध्येही जात नाही याबाबत अनेक ज्युनिअर डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले आहे. जळगांव शहराची लोकसंख्या ५ लाखाच्या आसपास आहे. लहानमोठे आजार प्रत्येकाच्या घरात आहेतच अशावेळी शहरातील शासकीय रूग्णालयातील ओपीडी एक मात्र आधार ठरू शकतो म्हणून आपण नागरीकांचे जीव वाचविण्याकरीता तातडीने शहरातील जिल्हा रूग्णालय सुरू करावे व तेथील कोविड रूग्णालय तात्काळ बंदचे आदेश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Protected Content