पालघर लिंचिंग प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्या प्रकरणी आज दोन याचिकांवर सुनावणी करतांना  सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारसह अन्य पक्षांना नोटीस बजावली आहे. तसेच सर्व पक्षांना जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात जबाब नोंदविण्यास सांगितले गेले आहे.

 

 

पालघरमधील जमावाने कल्पवृक्षगिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांच्या चालकासह तीन जणांची निर्घृण हत्या केली. त्यांनतर देशात महाराष्ट्रातील उद्धव सरकारवर कायदा-सुव्यवस्थेबाबत टीका झाली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये घनश्याम उपाध्याय नावाच्या कुटुंबाने साधू आणि जुना आखाडा यांच्या नातेवाईकांसह एनआयए चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत१०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Protected Content