जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाची लाट ओसरतांना दिसून येत असतांनाच गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात फक्त एक कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, जिल्हा माहिती कार्यालयाने गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात फक्त एक कोरोना रूग्ण आढळून आल्याची माहिती दिली आहे. यानुसार हा रूग्ण भुसावळ तालुक्यातील आहे. हा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व तालुक्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही. तर गेल्या २४ तासांमध्ये पाच कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात आता फक्त १९ सक्रीय कोरोना रूग्ण असून यातील १४ पेशंट हे होम आयसोलेशन मध्ये असून पाच जण विलगीकरण कक्षात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.