जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला ट्रेंड कायम राहत आज देखील कोरोनाच्या नवीन रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त रूग्णांनी या विषाणूवर मात केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे आता दिसून येत असून नवीन रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण आता बर्यापैकी कमी झाल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आज सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात २११ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर गत २४ तासांमध्ये २४३ रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधीत ८४ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. यामुळे जळगावातील कोरोनाचा कायम असणारा संसर्ग हा थोड्या चिंतेचा विषय आहेच. दरम्यान, आज अखेरीस जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा तब्बल ९२.५५ टक्क्यांवर पोहचला असून मृत्यू दर २.४० टक्के इतका असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे.