जळगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कातील लोकांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री गा. गुलाबराव पाटील हे ठाणे येथून महापालिका निवडणुकीची सूत्रे हलवत होती. त्यांना थोडी लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी चाचणी केली. यात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
आपण खासगी रूग्णालयात उपचार घेत असून प्रकृती चांगली आहे. परंतु, आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.