भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर भुसावळात शिवसेनेतर्फे सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे.
वाढत्या रूग्णसंख्येमुळे कोरोनाबाधितांना बेड मिळवताना कसरत करावी लागत आहे. शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कोरोना रुग्ण मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य सेवा तोकड्या पडत आहेत. रुग्णांना माहिती व मदतही मिळत नाही. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना टेस्टिंगपासून उपचारापर्यंत व डिस्जार्ज देण्यापर्यंतची मदत शिवसेनेने सुरु केली आहे. रुग्ण व नातलगांच्या मदतीसाठी भुसावळ शहर शिवसेनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सरु केला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून कोरोना सहायता कक्षाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करण्यात येणार आहे. तसेच शासकीय दरानुसार बिलांची पडताळणी करण्यात येईल. कक्षाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जागृती केली जाईल. तसेच विविध रुग्णालयातून रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवण्याचे काम केले जाईल. मदत कक्षात सोशल डिस्टन्सचे पालन करत समस्यांचे निवारण केले जाईल अशी माहिती शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी दिली.
शहरात कोरोना सहायता कक्षामध्ये शहरप्रमुख बबलू बर्हाटे, उपशहरप्रमुख पवन नाले, धनराज ठाकूर, गोकुळ बाविस्कर व शरद जोहरे यांचा समावेश आहे.