भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे एक संसाररथ मार्गावर !

भुसावळ प्रतिनिधी । भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ शाखेने समुपदेशन करून एक संसाररथ आज मार्गावर आणला.

आसोदे येथील भुषण चीरमाडे व  गोजेरे येथील सौ. किर्ती उर्फ भारती  यांचा २०१८ मधे विवाह संपन्न झाला. विवाहानंतर  १ वर्ष सर्व  चांगले सुरळीत  चालू होते. पण हळू हळू त्यांच्यात वाद विवाद  सुरू झाले या मधे त्यांना बाळ सुध्दा झाले. पण छोट्या छोट्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन कीर्ती बाळाला घेऊन माहेरी गोजोरे येथे आली. काही दिवसांनी भुसावळ येथील भोरपंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतु समुपदेशन कक्षात कीर्ती व भुषण दोघांचे आधी वैयक्तिक व नंतर एकत्र समुपदेशन केल्या नंतर दोघांनी घटस्फोटाचा विचार रद्द करुन एकत्र संसार करण्याची इच्छा व्यक्त केली.

सचिव डाॅ. बाळू पाटील व अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व कायदेशीर बाबिंची/ कागदपत्रांची पुर्तता करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड प्रकाश पाटील, सचिव डाॅ. बाळू पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. अजय भोळे, समुपदेशन कक्षाच्या चेअरमन सौ. आरती चौधरी, सदस्य सौ. मंगला पाटील व सौ. जयश्री चौधरी यांच्या उपस्थितीत सौ. किर्तीला सासरी पाठवणी करण्यात आली. किर्ती व भुषण ला सर्व सदस्यांनी आशिर्वाद देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.