जिल्ह्यात आज ११८२ कोरोना बाधीत; अमळनेर, रावेर, मुक्ताईनगरातही वाढला संसर्ग !

जळगाव प्रतिनिधी । गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ११८२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आजचे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव शहर, अमळनेर, चोपडा आणि भुसावळासह आता रावेर आणि मुक्ताईनगरातही कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज देखील एक हजारापेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ११८२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत १०९० पेशंट बरे झाले आहेत. आज सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहरातील असून येथील रूग्णसंख्येचा आकडा ३३३ इतका आहे.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१०२; भुसावळ-६०; अमळनेर-१११; चोपडा-२२३; पाचोरा-१६; भडगाव-०३; धरणगाव-३९; यावल-६३; एरंडोल-३८; जामनेर-२४; रावेर-६३; पारोळा-०२; चाळीसगाव-२; मुक्ताईनगर-६३; बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील १४ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल १५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. यातील सर्वाधीक ५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत.

Protected Content