आजपासुन महाराजस्व अभियानास प्रारंभ

 

रावेर, प्रतिनिधी । महसूल विभागाकडून तालुक्यातील शेतकरी व नागरिकांकडे थकबाकी असलेला महसूल कर जमिनीचे,शेती,बिनशेती,गौणखनिज, वर्ग दोन मधील जमिनीची बेकायदेशीर झालेले व्यवहार शोधून त्यांचा नजराणा वसूल करणे, अशा विविध माध्यमातून रावेर तहसील कार्यालयाला महसूल वसुलीचे या आर्थिक वर्षासाठी १० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

गेल्यावर्षी दिलेले ७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शना खाली शंभर टक्के पूर्ण करण्यात आला होते. या वर्षी यामध्ये तीन कोटी रुपयांनी वाढ करून १० कोटी रुपये शासनाकडे महसूल कर वसूल करून तो देखील पूर्ण करण्याचे आमचे लक्ष असणार आहे.यासाठी जनतेने व शेतक-यांनी सहकार्य करण्याचे अवाहन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केले आहे.

शासनाला शंभर टक्के वसूल करून द्यायचा असल्यामुळे महसूल विभागाचे सर्व कर्मचारी कामाला लागले आहेत . महाराजस्व अभियाना अंतर्गत नजराणा वसुलीसाठी ज्या शेतकरी किंवा नागरिकांची वर्ग दोन शेती प्लॉटची जमिनीची बेकायदेशीर खरेदी,विक्री चे व्यवहार केलेले आहे अशांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे . असे प्रकरण शोधून त्यांच्याकडून नजराणा वसूल करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली आहे.

शेतक-यांना फिरवू नका तलाठ्यांना सूचना

पुढे संजय तायडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना किंवा प्लॉटधारकांना नोटिसा देऊन त्यांनी कर न भरल्यास त्यांच्या जमिनी व प्लॉट शासन दरबारी जमा करणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी घेतलेल्या बैठकीत सर्व मंडळधिकारी आणि तलाठी यांना सूचना केल्या आहेत. लोकांच्या शेती प्लॉट संदर्भातील नोंदी वेळेच्या वेळी करा शेतकऱ्यांना फिरवा फिरव करू नका ,शेतकयांच्या तक्रारी येऊ देऊ नका. त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे देखिल सूचना देण्यात आले आहे.

Protected Content