जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा सर्वत्र प्रकोप आढळून येत असतांना आता जिल्हा कारागृहातही या विषाणूने प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. जेलमधील १८ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कारागृहामध्ये नव्याने दाखल होणा-या बंद्याकरिता तात्पुरती अलगीकरणाची सुविधा करुन देणेकरिता तात्पुरते कारागृह तयार करणेबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आले होते. या निर्देशाचे अनुषंगाने जळगाव जिल्हा कारागृह येथे स्वतंत्र केविड केअर सेंटर व स्वतंत्र संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कारागृहामध्ये आजपावेतो दाखल झालेल्या सर्व ४०० बंद्यांची कोविड चाचणी आरोग्य विभाग, महानगरपालिका, जळगाव यांचेमार्फत करण्यात आलेली आहे. त्यापैकी १८ बंदी हे कोरोना बाधित आढळून आलेले आहेत. उर्वरित सर्व बंदी हे निगेटिव्ह आढळून आलेले आहेत. सर्व बंद्यांची तपसणी करण्यासाठी एक डॉक्टर व दोन नर्सिग स्टाफ यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत सर्व बंद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. कोरोना बाधित आढळून आलेल्या १८ बंद्यांपैकी ५ बंद्यांची न्यायालयाव्दारे जामिनावर मुक्तता करण्यात आली असून त्यांना जळगाव शहरातील केविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे.
सद्य:स्थितीत जळगाव जिल्हा कारागृहामध्ये १३ कोरोना बाधित बंदी दाखल असून त्यांची व्यवस्था कारागृहामधील स्वतंत्र कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे व त्यांचेवर नियमितपणे उपचार व देखभाल वैद्यकीय पथकामार्फत सुरु आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news